जळगाव : युवकांचा सर्वांगीण विकास साधणे, संस्कृती व परंपरांचे जतन करणे, युवकांमधील सुप्त कलागुणांना वाव देणे तसेच राष्ट्रीय एकात्मतेची भावना वृद्धिंगत करणे, या उद्देशाने शासनामार्फत दरवर्षी जिल्हा, विभाग, राज्य व राष्ट्रीय स्तरावर युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते.
सन २०२६-२७ मधील जिल्हा युवा महोत्सवाचे आयोजन दि. २६ ऑक्टोबर ते १६ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत करण्याबाबत दि. ८ ऑक्टोबर २०२६ रोजी झालेल्या ऑनलाइन बैठकीत निर्देश देण्यात आले आहेत. या महोत्सवाचा सविस्तर कार्यक्रम लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
यावर्षी जिल्हा युवा महोत्सवात समूह लोकगीत, समूह लोकनृत्य, पथनाट्य, चित्रकला आणि कविता लेखन या स्पर्धांचा समावेश करण्यात आला आहे. या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक युवकांनी तसेच स्पर्धेचे नियम, सहभागी कलाकारांची संख्या आणि रोख पारितोषिकांसंदर्भातील अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या ९८२३७७३७९७ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी दिलीप दिघे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.















Discussion about this post