तुम्हीही सरकारी नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. धर्मादाय संघटनेच्या आस्थापनेवरील गट ब व गट क संवर्गातील रिक्त पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीसाठी दहावी पास ते पदवीधर उमेदवार अर्ज करू शकणार आहे.
या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 ऑक्टोबर 2025 पर्यंत आहे. त्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावा.
ही पदे भरली जाणार?
1) विधी सहायक 03
2) लघुलेखक (उच्च श्रेणी) 02
3) लघुलेखक (कनिष्ठ श्रेणी) 22
4) निरीक्षक 121
5) वरिष्ठ लिपिक 31
पदांनुसार आवश्यक पात्रता :
पद क्र.1: (i) विधी पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 120 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 100 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
पद क्र.4: पदवीधर
पद क्र.5: (i) पदवीधर (ii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
| जाहिरात (PDF) | Click Here |
| Online अर्ज | Apply Online |
वयाची अट: 03 ऑक्टोबर 2025 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/अनाथ/आ.दू.घ.: 05 वर्षे सूट]
अर्ज शुल्क: खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय/अनाथ: ₹900/-]















Discussion about this post