धरणगाव : धरणगाव तालुक्यातील कल्याणेहोळ येथील 33 वर्षीय तरुणाचा नदीपात्रात तोल जावून पडल्याने मृत्यू झाला कल्पीत जगन्नाथ निकम (33, कल्याणेहोळ, ता.धरणगाव) असे मयताचे नाव आहे. याबाबत धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
कल्पीत निकम हा आपल्या परीवारासह धरणगाव तालुक्यातील कल्याणे होळ येथे वास्तव्याला होता. बुधवार, 20 सप्टेंबर रोजी दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास गावाच्या बाहेर असलेल्या नदीच्या किनार्याजवळून जात होता. त्यावेळी त्याचा तोल गेल्याने तो पाण्यात पडला. त्यातच त्याचा बूडून मृत्यू झाला.
हा प्रकार लक्षात आल्यानंतर परीसरातील ग्रामस्थांनी धाव घेवून बाहेर काढून तातडीने धरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी अंती मयत घोषीत केले. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलीस नाईक दीपक पाटील करीत आहे.
Discussion about this post