जळगाव । धरणगाव तालुक्यातील विहीर फाट्याजवळ सिनेस्टाईल पाठलाग करत एकावर गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.गोपाळ सोमा मालचे (वय ४०, रा. वाकटुकी ता.धरणगाव) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. तो वाकटुकी गावात परिवारासह राहत होता
आरोपींनी दोन ते तीन फायर केल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणातील आरोपी हा स्वतःहून धरणगाव पोलीस ठाण्यात हजर झाला घटनेची माहिती मिळताच धरणगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी पवन देसले यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी रवाना झाले होते. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
दरम्यान सन २०१० साली एका खून प्रकरणांमध्ये गोपाळ मालचे याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. दरम्यान मंगळवार संशयित आरोपी राहुल ज्ञानेश्वर सावंत (कोळी) हा गोपाळ मालचे याच्यावर दबा धरून बसला होता. त्याचे वडील ज्ञानेश्वर सावंत कोळी यांचा २०१० साली खून झाला होता व तो खून गोपाळ मालचे यांनी केल्याचे त्याचे म्हणणे आहे.
रात्री ८ वाजता वाकटुकी फाट्याजवळ गोपाळ मालचे हे आले असता त्यांच्यावर राहुल सावंत याने त्याच्याकडील गावठी पिस्तुलातून बेछूट चार वेळेस गोळीबार करीत हत्या केली. थेट डोक्यामध्ये गोळी शिरल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, या घटनेमुळे धरणगाव तालुक्यासह जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे संशयित आरोपी राहुल सावंत कोळी हा स्वतःहून धरणगाव पोलीस स्टेशनला हजर झाला आहे.
Discussion about this post