सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महत्वाची बातमी आहे. केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळ सचिवालयामार्फत २५० जागांसाठी भरती जाहीर करण्यात आलीय. डेप्यूटी फील्ड ऑफिसर या तांत्रिक पदांसाठी ही भरती होत असून अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख १४ डिसेंबर २०२५ अशी निश्चित करण्यात आली आहे.
ही पदे विविध तांत्रिक शाखांमध्ये असून, या भरती प्रक्रियेत स्वतंत्र लेखी परीक्षा न घेता उमेदवारांची निवड पात्रता आणि गेट स्कोअरच्या आधारे केली जाणार असल्याची माहिती अधिसूचनेत देण्यात आली आहे.
डीएफओ पदांसाठी उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून इंजिनिअरिंग किंवा टेक्नॉलॉजी विषयातील बॅचलर किंवा मास्टर्स पदवी असणे आवश्यक आहे. याबरोबरच, अर्जदाराने संबंधित विषयातील गेट परीक्षा उत्तीर्ण असावी आणि त्याचे वैध स्कोअरकार्ड अनिवार्य आहे. पदांसाठी ३० वर्षे कमाल वयोमर्यादा लागू आहे. आरक्षण प्रवर्गानुसार उमेदवारांना शासनमान्य वयोमर्यादेत सूट देण्यात येणार आहे.
भरती कुठल्या शाखांमध्ये?
अधिसूचनेनुसार डीएफओ पदे खालील तांत्रिक शाखांमध्ये भरली जाणार आहेत :
कंप्यूटर सायन्स
माहिती तंत्रज्ञान
डेटा सायन्स
सिव्हिल इंजिनिअरिंग
मॅकेनिकल इंजिनिअरिंग
भौतिकशास्त्र
तांत्रिक ज्ञान, डेटा विश्लेषण क्षमता आणि फील्डवर्कसाठी आवश्यक कौशल्य असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार असल्याची प्राथमिक माहिती मिळते.
अर्ज प्रक्रिया ऑफलाइन
भरती प्रक्रियेसाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने स्वीकारले जातील. उमेदवारांनी अधिकृत अधिसूचनेमध्ये उपलब्ध असलेला अर्जाचा नमुना डाउनलोड करून प्रिंटआउट घ्यावा.
फॉर्ममध्ये आवश्यक माहिती काळजीपूर्वक भरून त्यावर पासपोर्ट आकाराचा फोटो चिकटवायचा आहे.
शैक्षणिक कागदपत्रांच्या प्रती जोडून अर्ज स्पीड पोस्टद्वारे सचिवालयाच्या निर्धारित पत्त्यावर पाठवावा. पोस्ट करण्याची शेवटची तारीख लक्षात घेऊन अर्ज वेळेत पोहोचेल याची खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. केंद्रीय स्तरावरील तांत्रिक पदावर परीक्षा न देता, केवळ गुणपत्रिका आणि स्कोअरकार्डच्या आधारे मिळणारी ही संधी अभियांत्रिकी पदवीधरांसाठी महत्त्वाची मानली जात आहे.















Discussion about this post