मुक्ताईनगर । जळगाव जिल्ह्यात तापमान 47 अंशावर गेले असून यामुळे प्रचंड उष्णता जाणवत आहे. या वाढत्या तापमानाचा फटका आता केवळ शेती पिकांना बसतो आहे असे नव्हे तर मुक्या जनावरांना देखील बसू लागला आहे.
या वाढत्या उष्णतेमुळे मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हाकाकोडा गावात मेंढपाळ कुटुंबियांच्या शंभर हून अधिक मेंढ्या या उष्माघातामुळे मरण पावल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. यामुळे मेंढपाळ कुटुंबीयांचे मोठं नुकसान झालं आहे.
या घटनेनंतर आ चंद्रकांत पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन मुख्यमंत्र्यांना नुकसान ग्रस्त मेंढपाळ कुटुंबीयांना मदतीचे आव्हान केले आहे. स्थानिक पशू चिकित्सक यांनी या मेंढ्यांचे शवविच्छेदन केले असून उष्माघाटाने मरण पावल्याचे निदान केले आहे
Discussion about this post