एरंडोल : शहरातील हिमालय पेट्रोल पंपामागील परीसरात नगरपालिकेच्या एका बांधकामाच्या ठिकाणी दहा वर्षीय चिमुकल्याच्या छातीत आसारी शिरल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. विशाल रवींद्र भील (10, हिमालय पेट्रोल पंपामागे, एरंडोल) असे मयताचे नाव असून या घटनेनंतर नातेवाईकांसह नागरीक आक्रमक झाले असून दोषी ठेकेदारावर कारवाईची मागणी करण्यात आली.
विशाल हा आई, वडील, लहान भाऊ-बहिण यांच्यासह वास्तव्याला होता. हातमजुरी करून त्याचा परीवार उदरनिर्वाह करतो. एरंडोल नगरपालिकेतर्फे हिमालय पेट्रोलपंपामागे गटारीचे ढापे टाकण्यासाठी कंत्राट देण्यात आले आहे
मात्र काही आसार्या धोकादायक स्थितीत ठेवलेल्या असतानाच सोमवारी सायंकाळी खेळत असलेल्या विशालच्या शरीरात आसारी शिरल्याने त्याचा मृत्यू झाला. स्थानिक नागरीकांनी धाव घेत त्याला खाजगी रुग्णालयात उपचाराला नेले असता वैद्यकीय अधिकार्यांनी त्याला मयत घोषित केले.















Discussion about this post