जळगाव : जिल्ह्यातील गंभीर गुन्हेगारांविरोधात जिल्हा पोलिस अधीक्षकांकडून धडक कारवाईचा सपाटा कायम असून अनेकांवर मोक्कासह हद्दपारीची कारवाई केली. अशातच जळगावातील पाच जणांच्या गुन्हेगारी टोळीला हद्दपार करण्यात आल्याचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षकांनी काढले आहे. या कारवाईने खळबळ उडाली आहे.
टोळी प्रमुख हितेश संतोष शिंदे (25), संतोष उर्फ जांगो रमेश शिंदे (45), आकाश उर्फ नागतोड्या संजय मराठे (22), सुमीत उर्फ गोल्या संजय मराठे (27), संजय देवचंद मराठे (50, सर्व रा.चौगुले प्लॉट, कांचन नगर, जळगाव) अशी हद्दपार टोळीतील सदस्यांची नावे आहेत.
टोळीतील सदस्यांविरोधात शनिपेठ, जिल्हा पेठ, एमआयडीसी, जळगाव शहर पोलिसात खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, दंगल, दुखापत, घातक हत्यार बाळगणे, मारामारी, शिवीगाळ, दमदाटी आदेशाचे उल्लंघण या सदराखाली सात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. संशयितांनी गुन्हे टोळीने केलेले आहेत. या पाचही जणांची टोळी जळगाव शहरात ठिक-ठिकाणी दहशत पसरत असल्याने नागरीकांच्या जीवाला धोका तसेच जंगम मालमत्तेस धोका निर्माण झाला होता. जळगाव जिल्ह्यातील सार्वजनिक शांतता सुव्यवस्था अबाधीत ठेवण्याबाबत त्यांच्याविरुध्द वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करुन सुध्दा त्यांच्या वर्तनात सुधारणा झाली नसल्याने संशयिताना हद्दपार करण्यासाठी शनिपेठ निरीक्षक रंगनाथ धारबडे, एएसआय संजय शेलार, हवालदार अश्विन हडपे, परीष जाधव, कॉन्स्टेबल राहुल पाटील, अनिल कांबळे, राहुल घेटे, मुकूंदा गंगावणे आदींनी प्रस्ताव तयार करीत तो जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांच्याकडे सादर केला.
Discussion about this post