जळगाव : जळगावात गुन्हेगारी काही कमी होताना दिसत नाहीय. शिल्लक कारणांवरून अनेकवेळा हातापायी होत असल्याच्या घटना समोर आल्या. यातच आता मित्रांमध्ये सुरु असलेली मस्ती एकाच्या जीवावर उठली. मजा मस्ती करत असताना शुल्लक कारणावरून वाद होऊन एकाने मित्राच्या गळ्यावर वार केला. यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जळगाव शहरातील समतानगर परिसरात ही घटना घडली. समतानगर परिसरात वास्तव्यास असलेले पवन राठोड व किरण गायकवाड हे दोघे मित्र गप्पा करत बसले होते. या दरम्यान त्यांच्यात मजा-मस्ती सुरू होती. या मजा मस्तीत पवनने किरणला शिवी दिली. शिवी दिल्याचा राग आल्याने किरणने मित्राच्या थेट गळ्यावर चाकूने वार करून गंभीर जखमी केले.
जिल्हा रुग्णालयात दाखल
यात गंभीर जखमी झालेल्या पवनला लागलीच जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. त्याच्यावर सध्या उपचार सुरु असून पवनच्या जबाबावरून रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे. सहाय्यक निरीक्षक रोहिदास गभाले तपास करीत आहेत.















Discussion about this post