जळगाव । यंदाचं वर्षही कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी निराशनजक गेलं. कापसाला अजूनही समाधानकारक भाव मिळत नाहीय. खान्देश, विदर्भात कापसाचे उत्पादन सर्वाधिक आहे. त्या भागात जिनिंग मील मोठ्या प्रमाणावर आहे. परंतु दर मिळत नसल्याने शेतकरी नाराज आहेत.
केंद्राचे हमीभाव ७ हजार रुपये आहे. मात्र, कापसाच्या खासगी बाजारपेठेत कापसाचे दर उतरले आहे. खासगी व्यापारी कापसाला ६८०० ते ७ हजार भाव मिळत आहे. शेतकऱ्यांना हमी भावापेक्षा कमी दराने कापूस विकावा लागत आहे. परंतु आंतरराष्ट्रीय वायदे बाजारात कापसाचे दर वाढले आहे. वायदे बाजारात मागील आठवड्यात ७२.३४ सेंट प्रति पौंडवर कापसाचे दर होते. ते आता ७२.६९ सेंट प्रति पौंडवर गेले आहे. त्यामुळे देशातील बाजारपेठेतही कापसाचे दर वाढणार आहे.
यंदा कापसाचे नुकसान, जास्त दराची अपेक्षा
नैसर्गिक आपत्तीनंतर उरलेल्या कापसाला चांगला भाव मिळेल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. दसऱ्यापासूनच बाजारात बागायती कापूस दाखल झाला. परतीच्या पावसाने झोडपल्यामुळे कापसाचे आणखी नुकसान झाले. त्यामुळे शेतातून येईल तसा कापूस साठविण्याऐवजी थेट बाजारात विक्रीसाठी शेतकरी आणत आहे. त्याचा फायदा घेत अनेक ठिकाणी व्यापाऱ्यांकडून दर कमी दिला जात आहे.
हमीभाव पेक्षा कमी भाव
केंद्र सरकारने २०२४-२५ साठी कापसाच्या हमीभावात ५०१ रुपयांची वाढ केली आहे. चालू हंगामात मध्यम धाग्याच्या कापसासाठी ७ हजार १२१ रुपये आणि लांब धाग्याच्या कापसासाठी ७ हजार ५२१ रुपय हमीभाव जाहीर केला आहे. परंतु खासगी व्यापारी त्यापेक्षा कमी दर देत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.
Discussion about this post