मुंबई । राज्यात सध्या हवामानात सातत्याने बदल होताना दिसत असून नागरिकांना कधी पावसाचा तर कधी थंडीचा अनुभव येत आहे. वातावरणातील चढ उतारामुळे गारठा काहीसा कमी झाला आहे. ठिकठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळत असून काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली. आज ढगाळ हवामानासह किमान तापमानात वाढ कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
आज राज्यात मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह अंशतः ढगाळ हवामान होत आहे. पहाटेच्या वेळी धुके आणि दुपारच्या वेळी उन्हाचा चटका वाढून, काहीसा उकाडा अनुभवायला मिळत आहे. किमान तापमानात वाढ कायम राहणार असून थंडी कमी – अधिक होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
वातावरणात सतत होणाऱ्या बदलावामुळे नागरिक हैराण झाले आहेत. ऐन थंडीत उन्हाचा चटका आणि अवकाळी पडणारा पाऊस अशा संमिश्र वातावरणाने नागरिकांना अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे.















Discussion about this post