मुंबई | CNG, PNG च्या किमतीमध्ये दिलासा देणारी बातमी आहे. महानगर गॅस लिमिटेडने सीएनजीचे दर 3 रुपये प्रति किलोग्रॅमने कमी केले आहेत. तसेच घरगुती पीएनजीचे दर 2 रुपयांनी कमी झाल्यामुळे मुंबई आणि उपनगरातील सीएनजीच्या किमती 76 रुपये प्रति किलोग्रॅम झाल्या आहेत. तर घरगुती पीएनजीचे दर 47 रुपये झाले आहेत. त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
महानगर गॅस लिमिटेडने नव्या दराचे आदेश 1 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून आणि 2 ऑक्टोबरच्या पहाटेपासून लागू केले आहेत. यापूर्वी एप्रिल महिन्यातही महानगर गॅस लिमिटेडने सीएनजीच्या किंमतीत 8 आणि पीएनजीच्या किंमतीत 5 रुपये प्रति एससीएमची कपात केली होती.
त्यामुळे तेव्हा सीएनजीचे दर 79 रुपये प्रति किलोग्रॅम झाले होते. तर पीएनजीचे दर 49 रुपये झाले होते. त्यापूर्वी मुंबईत सीएनजीचे दर 87 रुपये किलोग्रॅम होते तर पीएनजीचे दर 54 रुपये प्रति एससीएम होते. एप्रिलनंतर सहा महिन्यानंतर पुन्हा एकदा सीएनजी आणि पीएनजीच्या दरात कपात करून महागनगर गॅस लिमिटेडने मुंबईकरांना मोठा दिलासा दिला आहे.
Discussion about this post