सेंट्रल इंडस्ट्रीयल सिक्युरिटी फोर्स म्हणजे CISF मध्ये तब्बल १,१३० जागांसाठी पदभरती निघाली असून यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. विशेष म्हणजेच बारावी पास असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
CISF मध्ये कॉन्स्टेबल/फायर (Male) या पदांसाठी ही भरती होणार असून या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. महाराष्ट्र राज्यासाठी ७२ जागा रिक्त आहेत.
संपूर्ण देशभरात ही भरती होणार आहे. या नोकरीसाठी १२ वी पास उमेदवारांनी अर्ज करावेत. १२वीत विज्ञान शाखेतून पदवी प्राप्त उमेदवार अर्ज करु शकतात. तसेच त्यांनी तत्सम परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. या नोकरीसाठी १८ ते २३ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.
CISF मध्ये तुम्हाला पे स्केल ३ नुसार वेतन २१,७०० के ६९,१०० रुपये पगार मिळू शकतो. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड शारीरिक क्षमता चाचणी (PET), शारीरिक मापदंड चाचणी (PST), कागदपत्र पडताळणी (DV), लेखी परीक्षा द्यावी लागणार आहे. त्यानंतर वैद्यकीय चाचणी केली जाते.
या नोकरीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात.या नोकरीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणाऱ्या उमेदवारांना रोल नंबर दिला जाईल. त्यानंतर परीक्षेसाठी अॅडमिट कार्ड जारी केले जाईल. शारीरिक क्षमता चाचणीसाठी उमेदवारांना धावण्याची टेस्ट द्यावी लागणार आहे.
या नोकरीसाठी उमेदवारांना १०० रुपये अर्ज फी भरावी लागणार आहे. माजी सैनिक आणि आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना फी माफ आहे. या नोकरीसाठी परिक्षेबाबत सर्व माहिती https://cisfrectt.cisf.gov.in या वेबसाइटवर देण्यात आली आहे. या नोकरीसाठी परीक्षेच्या ठिकाणी उमेदवारांना आयडी प्रूफ, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, फोटो सोबत न्यावा लागेल.
Discussion about this post