सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. शहर व औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र मर्यादितमध्ये भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे.
सिडकोमध्ये चांगल्या पगाराची नोकरी तुम्हाला मिळणार आहे. सिडकोमधील या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावेत. या भरतीद्वारे विविध पदांच्या एकूण ३८ जागा भरल्या जाणार असून या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 मार्च 2025 आहे.
सहयोगी नियोजनकार 02 जागा, उपनियोजनकार 13 जागा, कनिष्ठ नियोजनकार 14 जागा, क्षेत्राधिकारी (वास्तुशास्त्रज्ञ) 09 जागा रिक्त आहे.
या नोकरीसाठी शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असणार आहे.
वयाची अट: 10 ऑक्टोबर 2024 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आदुघ/अनाथ: 05 वर्षे सूट, दिव्यांग: 07 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: नवी मुंबई
अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग: ₹1180/- [राखीव प्रवर्ग/माजी सैनिक: ₹1062/-]
एवढा पगार मिळेल?
सहयोगी नियोजनकार – 67,700/- ते 2,08,700/-
उपनियोजनकार – 56,000/- ते 1,77,500/-
कनिष्ठ नियोजनकार – 41,800/- ते 1,32,300/-
क्षेत्राधिकारी (वास्तुशास्त्रज्ञ) – 41,800/- ते 1,32,300/-
या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी https://ibpsonline.ibps.in/cidcojul24/या वेबसाइटवर जाऊन अर्ज करावेत. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड ऑनलाइन परिक्षेद्वारे करण्यात येणार आहे.
Discussion about this post