चोपडा । तालुक्यातील विरवाडे गावात एक दुखद घटना घडली आहे ज्यामध्ये एक तरुणाचा लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून खून करण्यात आला. ही घटना शनिवारी २८ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता घडली.
दादा बारकू ठाकूर, वय ३१, रा. विरवाडे ता. चोपडा, हा तरुण मित्रांसोबत दारूच्या पार्ट्या करतो आणि मित्रांना दारू पाजतो असे बोलण्याच्या संशय घेऊन तिघांनी मारहाण केली. दिनेश मधुकर कोळी, पिंटू उर्फ अरुण गोविंदा कोळी आणि शरद संतोष कोळी या तिघांनी शुक्रवारी २७ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता बैलगाडीचा लाकडी दांडक्याने दादा ठाकूरवर बेदम मारहाण केली. या मारहाणीत दादा ठाकूर गंभीर जखमी झाला आणि त्याला जळगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दादा ठाकूरचा उपचारादरम्यान शनिवारी २८ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मयत दादा ठाकूर यांची आई रजूबाई ठाकूर यांनी चोपडा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार मारहाण करणारे तिघे आरोपी चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांनी या घटनेचा पुढील तपास सुरू केला आहे.















Discussion about this post