पुणे । गाैतमी पाटील हिच्या अडचणीमध्ये मोठी वाढ झाल्याचे बघायला मिळत आहे. कारण पुण्यातील वडगाव पूल परिसरात गौतमी पाटीलच्या कारने झालेल्या अपघातात रिक्षाचालक गंभीर जखमी असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. आता या अपघातानंतर मंत्री चंद्रकांत पाटील आक्रमक झाले आहेत. याप्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करावी अशा सूचना पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या असून पोलिसांनी चौकशीसाठी गौतमी पाटीलला नोटीस बजावली आहे.
गौतमी पाटीलच्या वाहनाने 30 सप्टेंबर रोजी एका रिक्षाला पुण्यातील वडगाव पुलाजवळ मागून जोरदार धडक दिली. त्यामध्ये रिक्षाचालक मरगळे हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर दीनानाथ रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघात प्रकरणातील जखमीच्या कुटुंबीयांनी चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन न्याय मागितला.
मरगळे कुटुंबियांनी चंद्रकांत पाटील यांच्या जनता दरबारात न्याय मागत मदतीची मागणी केली. चंद्रकांत पाटील यांनी तात्काळ फोन फिरवला अन् गौतम पाटीलला उचलायचं की नाही? असा थेट सवाल केला. पाटील यांनी डीसीपी संभाजी पाटील यांना संपर्क साधून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. पोलिसांनी गौतमी पाटील हिला चौकशीसाठी हजर राहण्याच्या तात्काळ नोटीस पाठवली आहे.















Discussion about this post