Friday, February 13, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगाव जिल्ह्यात जात प्रमाणपत्र वाटपाचे कामकाज सुपरफास्ट !

सात महिन्यात ६५ हजार १४२ जात प्रमाणपत्रांचे वाटप

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
December 1, 2023
in जळगाव जिल्हा
0
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
बातमी शेअर करा..!

जळगाव | उपविभागीय महसूल अधिकारी (प्रांतधिकारी) यांच्या स्वाक्षरीने देण्यात येणारे जात प्रमाणपत्र (caste certificate) वाटपात जळगाव जिल्ह्यात मागील सात महिन्यात सूपरफास्ट कामकाज झाले आहे. मागील सात महिन्यात एससी, एसटी व ओबीसी प्रवर्गातील ६५ हजार १४२ जात प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले आहे. यामुळे शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना, नोकरीसाठी तरूणांना, घरकुल व महाडीबीटी शासकीय योजनेच्या लाभार्थ्यांना वेळेत जात प्रमाणपत्र मिळाल्याने फायदा झाला आहे. उपविभागीय अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली सर्व महसूल यंत्रणेचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी अभिनंदन केले आहे.

जिल्ह्यात १५ तालुक्यांतील नागरिकांसाठी ७ उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांमार्फत जात प्रमाणपत्र वाटपाचे कामकाज केले जाते. अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) व इतर मागास प्रवर्ग (OBC) जात प्रमाणपत्र वाटपात जळगाव जिल्ह्यात मागील वर्षाच्या (एप्रिल २०२२ – मार्च २३) तुलनेत यावर्षीच्या एप्रिल २०२३ ते ऑक्टोबर २०२३ च्या सात महिन्यात ५२ टक्के अधिक कामकाज झाले आहे. मागील वर्षी दररोजचे सरासरी २०० जात प्रमाणपत्र वाटप होत होते‌. तर यावर्षी दररोजचे सरासरी ३०६ जात प्रमाणपत्र वाटप होत आहेत. मागील‌ आर्थिक वर्षात २०२२-२३ मध्ये एकूण ७३२१७ जात प्रमाणपत्रांचे वाटप झाले. तर एप्रिल २०२३ नंतरच्या सात महिन्यात ६५१४२ जात प्रमाणपत्रांचे वाटप झाले आहे. चालू आर्थिक वर्षातील अजून पाच महिने शिल्लक आहेत. उपविभागीय अधिकारी जात प्रमाणपत्र समित्यांचे कामकाज असेच सुपरफास्ट चालले तर पुढील पाच महिन्यांत ४५ हजार जातप्रमाणपत्र वाटपाची शक्यता आहे.

“जात प्रमाणपत्रामुळे लोक वेगवेगळ्या शासकीय विभागांच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी अर्ज करू शकतात. जात प्रमाणपत्रामुळे रमाई, शबरी आणि प्रधानमंत्री आवास या गृहनिर्माण योजनांच्या लाभार्थ्यांची पहिली यादी वेळेत मंजूर होऊ शकते. जळगावमधून जास्त जण उच्च शिक्षणासाठी आणि सरकारी नोकरीसाठी अर्ज करत आहेत हे जात प्रमाणपत्रांच्या वाटपाच्या वाढलेल्या संख्येवरून दिसून येत आहे. सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी यांनी परिश्रम घेऊन वेळेत व योग्य प्रमाणपत्रे दिली आहेत.” अशी प्रतिक्रिया जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.

पाच वर्ष सात महिन्यात ३ लाख जात प्रमाणपत्रांचे वाटप

उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत जळगाव जिल्ह्यातील २०१८-१९ मध्ये १३६२१, २०१९-२० मध्ये ५७७५६, २०२०-२१ मध्ये ४२६१९, २०२१-२२ मध्ये ५४२६६, २०२२-२३ मध्ये ७३२१७ व एप्रिल २०२३- ऑक्टोबर २०२३ पर्यंत ६५१४२ प्रमाणपत्रांचे असे एकूण ३०६६२१ जात प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले आहे.

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व कुणबी प्रमाणपत्र वाटपात गती

जिल्ह्यात जात प्रमाणपत्रांसाठी आवश्यक कागदपत्रे व ऑनलाईन प्रक्रियेविषयी मोठ्या प्रमाणात जागृती झाल्याने जात प्रमाणपत्र वाटपात पारदर्शकता व गती आली आहे. २०२३ या वर्षातील सात महिन्यात अनुसूचित जातीचे ८२५९, अनुसूचित जमाती – ७८६१, कुणबी – २४१८६ जात प्रमाणपत्र वाटप करण्यात आले आहेत.

जात प्रमाणपत्रांसाठी आवश्यक कागदपत्रे (प्रवर्ग निहाय कागदपत्रे कमी जास्त लागू शकतात)

▫️ओळखीचा पुरावा मतदार ओळखपत्र / पारपत्र (पासपोर्ट) / वाहनचालक दाखला / आर एस बी वाय कार्ड / आधार कार्ड /निमशासकीय ओळखपत्र / पॅन कार्ड
▫️पत्त्याचा पुरावा मतदार ओळखपत्र / पारपत्र (पासपोर्ट)/ वाहनचालक दाखला / आधार कार्ड / वीज देयक/ पाणीपट्टी पावती / ७/१२ आणि ८ अ चा उतारा / भाडेपावती / दूरध्वनी देयक / शिधापत्रिका / वीज देयक / मालमत्ता करपावती.
▫️जात प्रमाणपत्रासाठी शपथपत्र (प्रपत्र २)
▫️स्वत: अथवा जवळच्या नातेवाईकांच्या जातीचा पुरावा म्हणून कोणते कागदपत्र ग्राह्य धरले जातात –
१. अर्जदार, अर्जदाराचे वडील अथवा आजोबांच्या प्राथमिक शाळा प्रवेश नोंदवहीचा उतारा, अर्जदार अथवा अर्जदाराच्या वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला.
२. अर्जदार, अर्जदाराचे वडील अथवा जवळच्या नातेवाईकाचा जन्म नोंदवहीचा उतारा.
३. अर्जदाराचे वडील अथवा जवळच्या नातेवाईकाच्या जात/समाजाचा उल्लेख असणारा शासकीय सेवा नोंदवहीचा उतारा.
४. अर्जदाराचे वडील अथवा जवळच्या नातेवाईकासाठी छाननी समितीने जारी केलेले वैधता प्रमाणपत्र.
५. ग्रामपंचायत नोंद अथवा महसूल नोंदीची प्रत.
६. जात अधिसूचित होण्याच्या तारखेपूर्वीच्या निवासाचे साधारण ठिकाण आणि जातीसंदर्भातील कागदोपत्री पुरावे.
७. सक्षम प्राधिकरणाने जारी केलेले अन्य संबंधित कागदोपत्री पुरावे.
▫️लागू असल्यास जोडावयाची अतिरिक्त कागदपत्रे.
▫️वडिलांच्या जातीचा पुरावा उपलब्ध नसल्यास नातेवाईकाचे जात प्रमाणपत्र आणि नातेवाईकासोबतच्या नात्याचा तपशील देणारे वंशावळीचे शपथपत्र (प्रपत्र३)
▫️विवाहित महिला असल्यास खालील दोन कागदपत्रे आवश्यक असतात :
१. विवाहापूर्वीच्या जातीचा पुरावा.
२. विवाहाचा पुरावा-विवाह नोंदणी प्रमाणपत्र आणि राजपत्रातील नाव बदलासंदर्भातील अधिसूचना. अर्जदाराने अन्य राज्य/जिल्ह्यमधून स्थलांतर केले असल्यास त्या राज्य/जिल्ह्यतील अर्जदाराच्या वडिलांच्या नावे जारी केलेले जात प्रमाणपत्र.

बातमी शेअर करा..!
Previous Post

युवा शेतकऱ्यांमध्ये शेती क्षेत्रात परिवर्तन करण्याची ताकद : कृषी आयुक्त डॉ. प्रविण गेडाम

Next Post

चोरीच्या सात दुचाकीसह चोरटा गजाआड

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
चोरीच्या सात दुचाकीसह चोरटा गजाआड

चोरीच्या सात दुचाकीसह चोरटा गजाआड

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
भीषण ! सहलीसाठी निघालेली विद्यार्थ्यांची बस उलटली; १४ विद्यार्थी जखमी

भीषण ! सहलीसाठी निघालेली विद्यार्थ्यांची बस उलटली; १४ विद्यार्थी जखमी

February 12, 2026
पाणी फाउंडेशनच्या फार्मर कप प्रशिक्षणासाठी जळगावातील शेतकरी रवाना

पाणी फाउंडेशनच्या फार्मर कप प्रशिक्षणासाठी जळगावातील शेतकरी रवाना

February 12, 2026
जळगावात अवैध शस्त्रासह तरुणाला अटक ; एलसीबीची कारवाई

जळगावात अवैध शस्त्रासह तरुणाला अटक ; एलसीबीची कारवाई

February 12, 2026
मुंबई मेट्रोमध्ये नोकरीची मोठी संधी ; लगेचच करा अर्ज

मुंबई मेट्रो नोकरी मिळविण्याची उत्तम संधी; तब्बल इतका मिळेल पगार?

February 12, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page