बँकेत नोकरी करण्याचे तुमचेही स्वप्न असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कॅनरा बँकेत मोठी महाभरती निघाली असून याबाबत बँकेने अधिसूचना जाहीर केली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीनं अर्ज मागविण्यात आले आहे. अप्रेटिंस पदासाठी ही भरती होणार आहे.
या भरती मार्फ़त तब्बल ३ हजार जागा भरल्या जाणार आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया २१ सप्टेंबरपासून सुरु झाली आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ ऑक्टोबर २०२४ आहे.या नोकरीबाबत सर्व माहिती canarabank.com वर देण्यात आली आहे. त्यामुळे ज्या तरुणांना कामाचा अनुभव घ्यायचा आहे त्यांनी या नोकरीसाठी अर्ज करावेत.
मुदतीनंतर अर्जप्रक्रिया बंद होणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. ज्या विद्यार्थ्यांचे आता ग्रॅज्युएशन पूर्ण झाले आहे त्यांच्यासाठी ही उत्तम संधी आहे. त्यामुळे या नोकरीसाठी अर्ज करावेत.canarabank.com या वेबसाइटवर जाऊन संपूर्ण माहिती वाचा.
या नोकरीसाठी २० ते २८ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. उमेदवाराने कोणत्या मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेली असावी. या नोकरीसाठी राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.
या नोकरीसाठी अर्ज करताना इच्छुक उमेदवारांना सर्वप्रथम www.nats.education.gov.in या वेबसाइटवर जाऊन स्वतः ला रजिस्टर करा वे लागेल. यानंतर तुम्हाला बँकेच्या नोकरीसाठी अर्ज करता येईल.
स्टेट बँक ऑफ इंडिया भरती
सध्या कॅनेरा बँकेसोबत स्टेट बँके ऑफ इंडियामध्ये भरती सुरु आहे. स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर पदासाठी ही भरती सुरु आहे. १००० पेक्षा जास्त पदांसाठी ही भरती सुरु आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवार या नोकरीसाठीही अर्ज करु शकतात. (
| जाहिरात (PDF) | Click Here |















Discussion about this post