नाशिक । नाशिकमधून एका भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. चाळीसगावहून मनमाडकडे जाणाऱ्या बसचा आणि कारचा अपघात झाला. यात कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला असून २ वर्षाचे बालक गंभीर जखमी झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आज १० च्या सुमारास नाशिक जिल्ह्यातील नांदगाव – छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर गंगाधरी येथे मनमाड आगाराची बस चाळीसगावहून मनमाडकडे जात होती. यावेळी समोरून येणाऱ्या कारची बसला समोरा समोर जोरदार धडक झाली. ही धडक ऐवढी भीषण होती की यात कारचा चक्काचूर झाला आहे. या घटनेत कार मधील तिघे जण जागीच ठार झाले तर एक २ वर्षांचा चिमुकला गंभीर जखमी झाला आहे.
मृतांमध्ये एक पुरुष तर दोन महिला यांचा समावेश आहे. मृत व्यक्तिंची नावे अद्याप समजू शकली नाही. दरम्यान, बस चालकाने हयगय आणि चुकीच्या पद्धतीने बस चालवल्याने हा अपघात झाला असल्याचा आरोप बसमधील प्रवाशांनी केला आहे. या अपघातामुळे या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा केला असून मृत तिघांचे शवविच्छेदन करण्यासाठी जवळील दवाखान्यात पाठवण्यात आले आहे. तर जखमी बालकावर उपचार करण्यात येत आहे.















Discussion about this post