एरंडोल : जळगाव जिल्ह्यात चोरट्यांनी धमाकूळ घातला आहे. चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आल्याचे दिसत आहे. अशातच एरंडोल शहरातील कागदीपुर्यात बंद घर असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी पावणेपाच लाखांचा ऐवज लांबविल्याची घटना घडलीय. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात एरंडोल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
शहरातील कागदीपुरा भागात किराणा व्यावसायीक खालीक अहमद रफिक अहमद (39) हे कुटूंबासह वास्तव्याला आहेत. अमरावती येथे लग्न असल्याने कुटूंब लग्नासाठी गावी गेल्याने 15 ते 17 नोव्हेंबरदरम्यान चोरट्यांनी संधी साधत घराच्या मागील दरवाजाला होल करीत कडी उघडून घरात प्रवेश केला.
दोन लाख 38 हजार 642 रुपये किंमतीचे एकूण 43 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिणे, 10 ग्रॅम वजनाचे दोन सोन्याचे हार, तीन ग्रॅम वजनाच्या सोन्यातील रींगा व अडीच लाखांची रोकड असा एकूण चार लाख 88 हजार 642 रुपये किंमतीचा ऐवज लांबवण्यात आला. पोलिस उपअधीक्षक सुनील नंदवाळकर, पोलिस निरीक्षक सतीश गोराडे यांनी भेट देत पाहणी केली.