सातवी पास असलेल्या तरुणांना मुंबई उच्च न्यायालयात ‘सफाई कामगार’ म्ह्णून नोकरी करण्याची सुवर्णसंधी चालून आलीय. या भरतीची जाहिरात संबंधित संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलीय. या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 20 जानेवारी 2025 आहे.
पदाचे नाव : सफाई कामगार
आवश्यक पात्रता : या भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार हा किमान सातवी उत्तीर्ण असावा तसेच संबंधित कामात अनुभव असावा.
वयाची अट: 01 जानेवारी 2025 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: मुंबई
अर्ज शुल्क : अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 300/- परीक्षा फी भरावी लागणार आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता: मा. प्रबंधक, सदस्य शाखा, उच्च न्यायालय, मुंबई वेतन व आस्थापना विभाग, दुसरा मजला, P.W.D. इमारत, फोर्ट, मुंबई- 400032















Discussion about this post