बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती सुरु असून यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. नगर अभियंता खात्यात ही भरती केली जाणार असून एकूण ६९० रिक्त पदे भरण्यात येणार आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नगर अभियंता मध्यवर्ती कार्यालयाद्वारे ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.या भरतीबाबत सविस्तर माहिती तुम्ही अधिकृत वेबसाइटवर जाऊन चेक करु शकतात. या नोकरीसाठी १८ ते ४३ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. सरकारी विभागात पर्मनंट नोकरी मिळवण्याची ही चांगली संधी आहे. कनिष्ठ अभियंता (सिव्हिल), कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल) पदासाठी भरती आहे.त्यानंतर स्थापत्य अभियंता पदासाठीही भरती सुरु आहे. ()
या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करा. सिव्हिल इंजिनियर पदासाठी उमेदवाराने सिव्हिल आणि कन्स्ट्रक्शन टेक्नोलॉजीमध्ये डिप्लोमा केलेला असावा.तर मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल इंजिनियर पदासाठी उमेदवाराने इलेक्ट्रिकल, ऑटोमोबाईल इंजिनियरिंगमध्ये डिप्लोमा केलेला असावा.
या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ डिसेंबर २०२४ आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेतील ही भरती परिक्षेद्वारे केली जाणार आहे. तुम्हाला ऑनलाइन परीक्षा द्यावी लागणार आहे.















Discussion about this post