मुंबई । महाराष्ट्रातील जळगावसह 29 महानगर पालिकेच्या निवडणुका होत असून या निवडणुकीसाठी मतदान होण्याआधीच राज्यातील महायुतीमधील घटक पक्ष भाजप-शिवसेनेने दमदार ओपनिंग केली आहे. राज्यात निवडणूकधीच ६९ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामध्ये ६८ उमेदवार हे महायुतीचे आहेत.
उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपचे तब्बल ४४ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यानंतर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या २२ उमेदवारांचा विजय निश्चित झालाय. सर्वाधिक बिनविरोध उमेदवार हे कल्याणमध्ये निवडून आले आहेत. सत्ताधारी सोडता फक्त इस्मामिक पक्षाचा एक उमेदवार बिनविरोध निवडून आलाय. अन्यथा भाजप आणि शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचेच उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस अथवा शरद पवारांच्या पक्षाचा एकही उमेदवार बिनविरोध निवडून आला नाही.
जळगाव महापालिकेमध्ये सुद्धा भाजप-शिवसेनेचा बोलबाला आहे. इथे सुद्धा दोन्ही पक्ष राजकीय दृष्ट्या फायद्यात आहेत. मतदानाआधीच जळगावमध्ये दोन्ही पक्षांचे डझनभर नगरसेवक निवडून आले आहेत. यात भाजप-शिवसेनेचे प्रत्येकी सहा नगरसेवक आहेत.
कुणाचे कुठे बिनविरोध उमेदवार
कल्याण -डोंबिवली – २१ (भाजप- १५, शिंदे – ६)
जळगाव – १२ (भाजप- ६ ,शिंदे -६)
पनवेल – ८ (भाजप- ८)
ठाणे – ७ (शिंदे – ७)
भिवंडी – ६ (भाजप- ६)
अहिल्यानगर – ५ (भाजप- ३,राष्ट्रवादी (AP)- २)
धुळे – भाजप- ३
पुणे – भाजप- २
पिंपरी-चिंचवड – भाजप- २
मालेगाव – इस्लाम पार्टी – १















Discussion about this post