मुंबई । एकीकडे विधानपरिषद निवडणुकीतील विजयाचा जल्लोष सुरू असतानच भाजपची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. नारायण राणे यांच्या खासदारकीवर मोठे संकट आले आहे. त्यांच्याविरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि लोकसभेचे पराभूत उमेदवार विनायक राऊत यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. नारायण राणे यांनी मतदारांना धमकावून विजय मिळवल्याचा आरोप या याचिकेतून करण्यात आला आहे.
याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, भाजप नेते नारायण राणे यांच्या खासदारकीला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि लोकसभेचे पराभूत उमेदवार विनायक राऊत यांनी ही याचिका दाखल केली आहे. निवडणूकीत राणे यांनी मतदारांना धमकावून विजय मिळवल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला आहे.
नारायण राणे यांनी मतदारांना धमकावून, पैसे वाटून मिळवलेला विजय रद्द करा तसेच निवडणूक काळातील भ्रष्टाचाराची स्वतंत्र चौकशी करा अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे. आता याबाबत हायकोर्ट काय निर्णय घेणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दरम्यान, रत्नागिरी- सिंधुदूर्ग लोकसभा मतदार संघामध्ये भाजप नेते नारायण राणेंविरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांच्यामध्ये लढत झाली होती. या निवडणुकीत नारायण राणे यांचा 47858 मतांनी विजय झाला होता. मात्र हा पैशाचा जिवावर झालेला विजय असल्याचा आरोप विनायक राऊत यांनी केला आहे.
Discussion about this post