मुंबई । महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष प्रकरणाबाबत मोठी बातमी असून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या दोन्ही गटातील आमदारांना अपात्रतेबाबत नोटीस पाठवून उत्तर देण्यास सांगितले होते. आता नार्वेकर यांनी दिलेली ही मुदत संपली असून 40 आमदारांनी या नोटीसीला उत्तर देण्यासाटी मुदतवाढ मागितली आहे, तर इतर १४ आमदारांच्या उत्तराचा आढावा घेणे अद्याप बाकी आहे.
विधीमंडळ कामकाज सुरु असल्याने किमान दोन आठवड्यांची मुदतवाढ देण्याची शक्यता आहे. विधानसभा अध्यक्ष, सचिव आणि इतर अधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली, त्यात यावर चर्चा झाली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई करावी, अशी मागणी ठाकरे गटाने केली होती. परंतु यासंबंधीचा निर्णय घेण्याचा अधिकार हा विधानसभा अध्यक्षांचा असल्याचं सुप्रीम कोर्टाने नमूद केलं होतं.
त्यामुळे आता विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेतात याकडे शिवसैनिक आणि राज्यातील जनतेचं लक्ष लागलं आहे. या संदर्भातच राहुल नार्वेकरांनी आमदारांना नोटीस पाठवली असून या नोटीसचं उत्तर देण्यासाठी आमदारांनी आणखीन थोडा वेळ मागितला आहे.















Discussion about this post