भुसावळ : शहरातील श्रीहरी नगरात रविवारी भरदिवसा दहा लाखांचा रोकड लांबवल्याचा प्रकार घडला असतानाच आता खडका रोडवरील पटेल कॉलनीनजीक वास्तव्याला असलेल्या केळी व्यापार्याच्या बंद घरातून चोरट्यांनी तब्बल साडेपाच लाखांचा ऐवज लांबवल्याचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. घरफोडी झाल्याने नागरीक धास्तावले आहेत.
इम्तियाज मो.युनूस बागवान (40, खडका रोड, पटेल कॉलनी, भुसावळ) हे केळी व्यापारी असून पत्नी, चार भाऊ, चार वहिनी व मुला-बाळांसह वास्तव्यास असून ते केळी व्यापारी आहेत. मामाच्या मुलाचे लग्न असल्याने बागवान परिवार 7 रोजी सकाळी नऊ वाजता रवाना झाला व बागवान यांचे बंधू मोहम्मद अनस याच दिवशी रात्री लग्न आटोपून घरी परतल्यानंतर त्यांना घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तुटलेला आढळल्याने त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी हा प्रकार भाऊ इम्तियाज बागवान यांना कळवला तसेच बाजारपेठ पोलिसांना माहिती दिली.
साडेपाच लाखांच्या ऐवजावर डल्ला
चोरट्यांनी घरातील चारही कपाटे फोडून त्यातील तीन लाखांची रोकड, दिड लाख रुपये किंमतीच्या व 50 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या बांगड्या, 40 हजारांच्या कानातील रींग, 30 हजार रुपये किेंमतीची अंगठी, 10 हजारांची सोन्याची चीव, 15 हजारांची कानातील साखळी, पंजाब नॅशनल बँकेचा सही केलेला कोरा चेक लांबवला. दरम्यान, चोरीला तब्बल 80 ग्रॅम सोने गेले असून त्याचे आजचे बाजारमूल्य सुमारे पाच लाख रुपये आहे.
Discussion about this post