भुसावळ । रेल्वे प्रशासनाने सणासुदीच्या पार्श्वभूमीवर भुसावळ – दादर दरम्यान धावणाऱ्या विशेष गाड्यांचा कालावधी वाढवला आहे. सोबतच एलटीटी -गोमतीनगर दरम्यान विशेष उत्सव गाडी चालवण्यात येणार आहे. याचा भुसावळ विभागासह खान्देशातील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे
भुसावळ दादर दरम्यान धावणाऱ्या विशेष गाड्यांचा कालावधी ३१ डिसेंबरपर्यंत वाढवला आहे. ०९०४९ दादर -भुसावळ व ०९०५० भुसावळ दादर त्री साप्ताहिक विशेष या पूर्वी २६ सप्टेंबरपर्यंत धावणार होती. या गाड्या आता ३१ डिसेंबरपर्यंत धावतील. ०९०५१ दादर -भुसावळ व ०९०५२ भुसावळ – दादर त्री साप्ताहिक विशेष आधी २९ सप्टेंबरपर्यंत अधिसूचित होती. या गाड्या आता ३१ डिसेंबरपर्यंत धावतील. वेळ व थांबे जुनेच कायम आहे.
एलटीटी – गोमतीनगर
०५३२६ एलटीटी – गोमतीनगर गाडी २८ सप्टेंबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत प्रत्येक रविवारी एलटीटी येथून सुटेल. ०५३२५ गोमतीनगर – एलटीटी गाडी २७सप्टेंबर ते १ नोव्हेंबर या कालावधीत प्रत्येक शनिवारी गोमतीनगरहून सुटेल. कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, राणी कमलापती, झाशी, कानपूर, लखनऊ सिटी येथे थांबे असतील.















Discussion about this post