Monday, August 24, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

बापरे! वाळू माफियांची मुजोरी, तहसीलदारांच्या अंगावर ट्रॅक्टर घालून चिरडण्याचा प्रयत्न

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 11, 2025
in महाराष्ट्र, क्राईम
0
बापरे! वाळू माफियांची मुजोरी, तहसीलदारांच्या अंगावर ट्रॅक्टर घालून चिरडण्याचा प्रयत्न
बातमी शेअर करा..!

जालना । राज्यातील अनेक ठिकाणी वाळू माफियांनी धुमाकूळ घातला असून अनेक ठिकाणी कारवाईसाठी जाणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांवर हल्ले केले जात असल्याच्या घटना समोर आले आहे. अशीच एक घटना जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातून समोर आलीय. ज्यात तहसीलदार विजय चव्हाण यांच्यावर अवैध वाळू उत्खननाच्या कारवाई दरम्यान ट्रॅक्टरने हल्ला करण्यात आला. सुदैवाने तहसीलदार बचावले, पण ही घटना प्रशासनासाठी चिंतेचा विषय आहे. दरम्यान तहसीलदारांनी देखील ४० किलोमीटरचा पाठलाग करत वाळूने भरलेले ट्रॅक्टर जप्त करण्याची कारवाई केली आहे. याप्रकरणी काही आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

नेमकं काय घडलं?
मंगळवारी (११ सप्टेंबर) भर दुपारी अंबड तालुक्यातील घोटण परिसरात दुधना नदीपात्रात बेकायदेशीर वाळू उत्खनन सुरु असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे तहसीलदार विजय चव्हाण यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली. महसूल पथक येत असल्याची कुणकुण वाळू माफियांना लागताच त्यांनी ट्रॅक्टरसह पळ काढण्यास सुरुवात केली.

यानंतर तहसीलदार विजय चव्हाण यांनी या वाळू माफियांचा तात्काळ पाठलाग सुरु केला. विजय चव्हाण यांनी साधारण पारनेर तांडा ते कर्जत असा ४० किलोमीटरपर्यंत पाठलाग केला. हा पाठलाग सुरू असतानाच एका वाळूने भरलेल्या ट्रॅक्टरच्या चालकाने वेग वाढवला. त्याने थेट तहसीलदार चव्हाण यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न केला. हा हल्ला जीवघेणा होता. मात्र ते त्यातून थोडक्यात बचावले.

कायदा आणि सुव्यवस्थेचे कोणतेही भान नाही
सुदैवाने या दुर्घटनेत विजय चव्हाण यांना कोणतीही मोठी दुखापत झाली नाही. वाळू माफियांचा हा थरार पाहून स्थानिक गावकरी त्यांच्या मदतीला धावून आले. त्यांनी तहसीलदारांना मदत केली. गावकऱ्यांनी केलेल्या सहकार्यामुळे महसूल पथकाला अखेर काही संशयितांना पकडण्यात यश आले. या घटनेनंतर वाळू माफियांची मुजोरी किती वाढली आहे, त्यांना कायदा आणि सुव्यवस्थेचे कोणतेही भान राहिलेले नाही, हे स्पष्ट होत आहे.

या घटनेनंतर आता प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या जीविताला धोका निर्माण करणाऱ्या या माफियांवर तात्काळ आणि कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या प्रकरणी महसूल पथकाने ट्रॅक्टरसह अवैध वाळूचा साठा जप्त केला आहे. ताब्यात घेतलेल्या संशयितांविरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. या घटनेनंतर प्रशासनाने अवैध वाळू उत्खननाविरोधात अधिक कठोर पावले उचलण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

खान्देशातील प्रवाशांना दिलासा ! भुसावळ-दादर एक्स्प्रेसचा कालावधी डिसेंबरपर्यंत वाढवला

Next Post

सरकारी कर्मचाऱ्यांसह पेन्शनधारकांना गुडन्यूज ! दिवाळीआधी पगारात आणि पेन्शनमध्ये होणार वाढ

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
शासकीय कर्मचा-यांसाठी खुशखबर! ७व्या वेतन आयोगाच्या चौथ्या हप्त्याची थकबाकी खात्यात जमा होणार

सरकारी कर्मचाऱ्यांसह पेन्शनधारकांना गुडन्यूज ! दिवाळीआधी पगारात आणि पेन्शनमध्ये होणार वाढ

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जळगाव ममुराबाद रस्त्यावर ट्रकने मुलाला चिरडले ! संतप्त जमावाने पेटवला ट्रक

जळगाव ममुराबाद रस्त्यावर ट्रकने मुलाला चिरडले ! संतप्त जमावाने पेटवला ट्रक

August 24, 2026
आचारसंहिता संपताच राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 19 धडाकेबाज निर्णय ; जाणून घ्या

आजच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत ४ मोठे निर्णय

August 24, 2026
कक्ष अधिकारी पदोन्नतीसाठीच्या विभागीय परिक्षेसंदर्भातील निकषाबाबत महिन्याभरात बैठक घेणार – मंत्री गुलाबराव पाटील

पाळधी-तरसोद बायपासच्या डांबरीकरणात मोठा भ्रष्टाचार? पालकमंत्र्यांच्या आरोपाने खळबळ

August 24, 2026
तुकाराम मुंढेंची भेसळखोरांवर नजर; तुमचं दूध किती शुद्ध? कसे ओळखायचे?

तुकाराम मुंढेंची भेसळखोरांवर नजर; तुमचं दूध किती शुद्ध? कसे ओळखायचे?

August 24, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page