भारत पेट्रोलियममध्ये सध्या भरती सुरु असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह आणि सचिव पदांसाठी ही भरती होत असून या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ फेब्रुवारी २०२५ आहे. इच्छुक उमेदवारांनी https://www.bharatpetroleum.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे.
ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह (क्वालिटी) या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना रासायनिक सायन्समध्ये BSc डिग्री प्राप्त केली असावी. उमेदवारांना ऑर्गॅनिक, फिजिकल, इनऑर्गॅनिक आणि अॅनालिटिकल केमिक्सट्रीमध्ये स्पेशलायझेशन केलेले असावी. याचसोबत रासायनिक अभियांत्रिकीमध्ये डिप्लोमा केलेला असावा. उमेदवारांकडे पेट्रोलियम/ऑइल अँड गॅस/ पेट्रो-केमिकल इंडस्ट्रीमध्ये कमीत कमी ५ वर्षांचा अनुभव असावा.
सेक्रेटरी पदासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर पदवी प्राप्त केलेली असावी.याचसोबक प्रशासनिक सेक्रेटरी, पीए/ एक्झिक्युटिव्ह / ऑफिस मॅनेजमेंट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे ६ महिन्याचा डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट कोर्स केलेला असावा.
या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची कमाल वयोमर्यादा २९ वर्षे असावी. या नोकरीसाठी अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना ११८० रुपये शुल्क भरावे लागणार आहे.
या नोकरीसाठी उमेदवारांची निवड सर्वप्रथम शैक्षणिक योग्यतेद्वारे केली जाणार आहे. त्यानंतर कॉम्प्युटर टेस्ट, ग्रुप डिस्कशन आणि मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.
Discussion about this post