नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना आनंदाची बातमी आहे. मुंबई येथील भाभा ऑटोमिक रिसर्ज सेंटरमध्ये भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. ज्या तरुणांचे शिक्षण पूर्ण झाले आहे त्यांच्यासाठी ही चांगली संधी आहे. नर्स या पदासाठी भरती सुरु आहे. १४ रिक्त जागांवर ही भरती करण्यात येणार आहे.
भरतीबाबत सर्व माहिती भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटरमध्ये https://www.barc.gov.in या वेबसाइटवर देण्यात आली आहे. भाभा ऑटोमिक रिसर्च सेंट रिक्रूटमेंट बोर्डाने ही भरती जाहीर केली आहे.
भाभा ऑटोमिक सेंटरमधील या भरतीसाठी वॉक इन इंटरव्ह्यू होणार आहे. १७ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी १० वाजता मुलाखत घेण्यात येणार आहे. या इंटरव्ह्यूमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ही नोकरी करण्याची संधी मिळणार आहे.
नर्स या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने १२ वी उत्तीर्ण असावे. त्याचसोबत मिडवाइफरी मध्ये डिप्लोमा किंवा बी.एससी नर्सिंग केलेले असावे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ४५ वर्ष असावे.
भाभा ऑटोमॅटिक सेंटरमध्ये मुलाखत २७ सप्टेंबरला होणार आहे. या मुलाखतीतून निवड झालेल्या उमेदवारांना २४,२३४ रुपये मासिक वेतन मिळणार आहे. तुम्हाला मुलाखतीसाठी परिषद क्रमांक-II,ग्राउंट फ्लोअर, बीएआरसी हॉस्पिटल, अणुशक्तीनगर, मुंबई ४०० ०९४ येथे उपस्थित राहायचे आहे.
माझगाव डॉकमध्येही नोकरीची संधी
सध्या माझगाव डॉकमध्येही सध्या भरती सुरु आहे. नॉन एक्झिक्युटिव्ह पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १ ऑक्टोबर २०२४ आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.















Discussion about this post