बँकेत सरकारी नोकऱ्यांसाठी नवीन भरती शोधणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. बँक ऑफ बडोदा (BOB) ने ४,००० पदांसाठी प्रशिक्षणार्थींची भरती जाहीर केली आहे. या भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. तसेच, बँकेच्या अधिकृत वेबसाइट www.bankofbaroda.in वर देखील अर्ज सुरू झाले आहेत.
उमेदवार १९ फेब्रुवारी २०२५ पासून या रिक्त पदासाठी अर्ज करू शकतात. बँक अप्रेंटिससाठी उमेदवारांकडून ११ मार्च २०२५ पर्यंत अर्ज स्वीकारले जातील.
पात्रता काय?
उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदवी असणे आवश्यक आहे. याशिवाय, उमेदवारांनी NAPS किंवा NATS मध्ये स्वतःची नोंदणी करणे देखील आवश्यक आहे.
वयोमर्यादा: या बँक भरतीसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांची वयोमर्यादा किमान २० वर्षे आणि कमाल २८ वर्षे असावी. वयोमर्यादा १ फेब्रुवारी २०२५ च्या आधारावर मोजली जाईल. त्याच वेळी, राखीव प्रवर्गांना उच्च वयोमर्यादेत सूट मिळेल.
स्टायपेंड- उमेदवारांना मेट्रो/अर्बन बँक शाखेत दरमहा १५००० रुपये स्टायपेंड मिळेल. तर ग्रामीण/अर्ध-शहरी शाखेत मासिक वेतन १२००० रुपये असेल.
निवड प्रक्रिया- उमेदवारांची निवड ऑनलाइन परीक्षा, कागदपत्र पडताळणी आणि स्थानिक भाषा चाचणीद्वारे केली जाईल.
प्रशिक्षण कालावधी- बँकेच्या या अप्रेंटिसशिपमध्ये उमेदवारांना १२ महिन्यांचे प्रशिक्षण मिळेल.
अर्ज करताना किती पैसे भरावे लागतील?
जनरल आणि ओबीसी कॅटेगरीच्या अर्जदारांना 800 रुपये एप्लीकेशन फी भरावी लागेल. एससी आणि एसटी श्रेणीच्या उमेदवाराला 600 रुपये आणि दिव्यांग अर्जदारांसाठी 400 रुपये फी निश्चित करण्यात आली आहे. सर्व श्रेणीच्या अर्जदारांना जीएसटी शुल्क सुद्धा भरावं लागेल.
अर्ज कसा करावा?
Bank of Baroda ची अधिकृत वेबसाइट bankofbaroda.in वर जा.
होम पेजवर दिलेल्या करिअर टॅबमध्ये क्लिक करा.
आता Current Opportunities टॅब वर क्लिक करा.
अपरेंटिस अप्लायसाठी लिंक वर क्लिक करा.
रजिस्ट्रेशन करा आणि फॉर्म भरा.
डॉक्यूमेंट्स अपलोड करा आणि फी जमा करुन सबमिट करा.
Discussion about this post