मंगळवारी देशातील लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला. यात महाराष्ट्रात धक्कादायक निकाल हाती आला आहे. महायुतीपेक्षा महाविकास आघाडीने जास्तीच्या जागा खेचून आणल्या आहेत. दरम्यान, बीड लोकसभेतून निवडून आलेले नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे यांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात झाला. सोलापूर – धुळे महामार्ग बजरंग सोनवणे यांच्या ताफ्यात असलेल्या गाडीचा अपघात झाला.
सोलापूर – धुळे महामार्ग शहागड येथे काही मुस्लिम बांधव बजरंग सोनवणे यांचा सत्कार करण्यासाठी थांबले होते. हा सत्कार स्वीकारण्यासाठी बजरंग सोनवणे यांची गाडी शहागड पुलावर थांबली. त्यावेळी त्यांच्या पाठीमागे त्यांच्या ताफ्यात फॉर्च्यूनर आणि स्विफ्ट गाडी होती. बजरंग सोनवणे यांच्या गाडीने ब्रेक लावल्यानंतर त्यांच्या पाठीमागे येणारे फॉर्च्यूनरने ही ब्रेक मारला.
या फॉर्च्युनर मागे चालत असलेल्या स्विफ्ट कारनेही ब्रेक मारला. परंतु ब्रेक मारताना स्विफ्ट कार चालकाचे नियंत्रण सुटले आणि या कारने बजरंग सोनवणे यांच्या गाडीच्या पाठीमागे चालणाऱ्या फॉर्च्युनर गाडीला धडक दिली. अपघातात स्विफ्ट कारमधील दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत. मात्र बजरंग सोनवणे यांच्या गाडीला आणि बजरंग सोनवणे यांना कुठलीही दुखापत झाली नाही.















Discussion about this post