नवी दिल्ली । आम आदमी पक्षाचे (आप) राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दारू धोरण घोटाळ्यातून निर्दोष मुक्त करण्यात आले आहे. न्यायालयाच्या निकालानंतर अरविंद केजरीवाल यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी अरविंद केजरीवाल मिडीयासमोर ढसाढसा रडले असून बोलताना, “मी भ्रष्टाचारी नाही.” असे म्हटले.
अरविंद केजरीवाल यांची पहिली प्रतिक्रया
माध्यमांशी बोलताना अरविंद केजरीवाल यांनी, “आज न्यायालयाने दारू धोरण घोटाळ्यातील सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केले आहे” असे म्हटले. तसेच त्यांनी, सत्याचा विजय होईल, सत्याचा नेहमीच विजय होतो आणि सत्याचाच विजय होत राहणार, असे म्हणत त्यांना भारतीय न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास होता की न्याय मिळेल” असे सांगितले.
अमित शहांनी सर्वात मोठा राजकीय कट रचला होता. त्यांनी आपच्या पक्षाच्या पाच मोठ्या नेत्यांना तुरुंगात टाकलं. भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच मुख्यमंत्री पदावर असलेल्या व्यक्तीला तुरुंगात ठेवण्यात आलं होतं. त्यावेळी केजरीवाल भ्रष्टाचारी आहेत असा आरोप करण्यात, पण मी भ्रष्टाचारी नाही, असं म्हणताना केजरीवालांना अश्रू अनावर झाले.
दिल्लीतील राऊज ॲव्हेन्यू कोर्टाने अरविंद केजरीवाल यांना दिल्ली एक्साइज पॉलिसी केसमध्ये निर्दोष मुक्त करण्यात आलंय. २०२२ मध्ये दिल्ली मद्य धोरणात गैरप्रकार झाल्याचा आरोप तत्कालीन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्याविरोधात करण्यात आला होता. यावेळी अरविंद केजरीवाल यांच्यासह २३ जणांची नावं आरोपपत्रात दाखल करण्यात आली होती.















Discussion about this post