जळगावसह महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांची गेल्या आठवड्यात घोषणा झाली. या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला आज २३ डिसेंबरपासून सुरूवात होणार आहे.
आजपासून उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार असून 30 डिसेंबर ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे आता महापालिकेच्या रणसंग्रमाला सुरुवात झालेली असून विविध भागांतील उच्छुक उमेदवार आजपासून अर्ज दाखल करण्यासाठी जय्यत तयारीत आहेत.
महापालिका निवडणुकांसाठी आजपासून अर्ज भरण्यास सुरूवात होणार असून 30 डिसेंबरपर्यंत ही प्रक्रिया चालणार आहे तर अर्जांची छाननी 31 डिसेंबरला होणार आहे. 2 जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. निवडणूक चिन्हांचं वाटप, अंतिम उमेदवारांची यादी 3 जानेवारीला प्रसिद्ध होईल. सर्व 29 महापालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान होईल तर 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे.
दरम्यान , पालिका निवडणुकीसाठी आता काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत मात्र अजूनही महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाचा तिढा सुटलेला दिसत नाही. युती याबाबत अद्याप घोषणा न झाल्याने स्पष्टता नसून उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी किती उमेदवार अर्ज भरण्यासाठी येतात, हे पाहणंही महत्वाचं ठरेल.















Discussion about this post