मुंबई । बारावीची बोर्डाची परीक्षा नुकतीच संपली. पेपर संपल्यानंतर विद्यार्थ्यांसह पालकांना आता निकालाची प्रतिक्षा लागली आहे. मात्र, अशातच विरारमध्ये शिक्षिकेच्या घराला लागलेल्या आगीमध्ये बारावी बोर्डाच्या परिक्षेच्या उत्तरपत्रिका जळून खाक झाल्याची घटना समोर आलीय.
उत्तरपत्रिका जळालेल्या त्या विद्यार्थ्यांचे काय होणार असा सवाल उपस्थित केला जात आहे. अशामध्ये या शिक्षिकेविरोधात कारवाई होणार असल्याची माहिती शिक्षणमंत्र्यांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विरारमध्ये राहणाऱ्या एका शिक्षिकेने 12 वी कॉमर्सचे पेपर रीचेकिंग साठी घरी आणले होते. हा पेपरचा गठ्ठा सोफ्यावर ठेवला होता. त्यानंतर घरातील लोक बाहेर गेले असताना अचानक शॉर्ट सर्किट झाल्यामुळे घरात आग लागली. त्यामध्ये घरातील सामानासह पेपरही जळून खाक झाले.
दरम्यान, आता पेपर जळाल्याचा विद्यार्थ्यांच्या निकालावर परिणाम होण्याची शक्यता आहे. मात्र, या शिक्षिकेने घरी का नेले आणि उत्तपत्रिका जळालेल्या विद्यार्थ्यांच्या निकालाचं काय होणारं? पेपर जळालेत्यांची पुन्हा परीक्षा होणार का? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत? शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी याप्रकरणावर प्रतिक्रिया देताना शिक्षिकेविरोधात कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले.















Discussion about this post