नाशिक । भोंदू अशोक खरात प्रकरणात दररोज नवे धागेदोरे समोर येत असून आता या प्रकरणात आणखी एका महिला अधिकाऱ्याचे नाव समोर आल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. SIT तपासात संबंधित महिला अधिकाऱ्याचा अशोक खरातशी संबंध असल्याची माहिती उघड झाली असून त्याला प्रशासकीय स्तरावर मदत केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, नाशिकमध्ये पोस्टिंग असताना या महिला अधिकाऱ्याने अशोक खरातला मदत केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. तसेच, त्या बदल्यात खरातने आपले नेटवर्क वापरून संबंधित अधिकाऱ्याला इच्छित पोस्टिंग मिळवून दिल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याशिवाय आर्थिक व्यवहार आणि काळ्या पैशांच्या व्यवहारांबाबतही तपास सुरू असल्याची माहिती आहे.
दरम्यान, या प्रकरणात संबंधित महिला अधिकाऱ्याची चौकशी होण्याची शक्यता असून तपास यंत्रणांनी पुरावे गोळा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. भोंदू अशोक खरातवर अनेक गंभीर गुन्हे दाखल असून या प्रकरणातील सर्व दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.















Discussion about this post