जळगाव । केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा महाराष्ट्र दौरा ठरला आहे. ५ मार्च रोजी अमित शाह महाराष्ट्रात दौरा करणार. अकोला, जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात या दिवशी वेगवेगळ्या कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज २८ फेब्रुवारी रोजी यवतमाळ दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौऱ्यानंतर शाह यांचा जळगाव दौरा निश्चित करण्यात येणार आहे. ५ मार्च रोजी सागर पार्क मैदानावर शाह यांची सभा घेण्याबाबत नियोजन सुरू आहे. मात्र, त्यांच्या जळगाव दौऱ्याची तारीख मिळाल्यावर सभेची तारीख निश्चित होणार असल्याचे आमदार सुरेश भोळे म्हणाले.
भाजपचे राष्ट्रीय नेते अमित शाह 5 मार्चला महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. अकोला, जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात या दिवशी वेगवेगळ्या कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार आहे. ज्यात, अकोला येथे क्लस्टरच्या बैठकीला शाहा हजर राहणार, तसेच जळगावमध्ये युवासंमेलनाला देखील अमित शाहा उपस्थित राहणार आहे. यासोबतच छत्रपती संभाजीनगर शहरात शाहा यांची जाहीर सभा देखील होणार आहे. त्यामुळे अमित शाहा यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून देखील जोरदार तयारी केली जाण्याची शक्यता आहे.















Discussion about this post