मुंबई । महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकींचा निकाल लागल्यानंतर दहा दिवस होत आले तरी महायुतीचे सरकार अजून अस्तित्वात आले नाही. मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी ठरला आहे, परंतु मुख्यमंत्रीपदाचे नाव जाहीर झाले नाही. या पार्श्वभूमीवर, भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने मंत्रिपदासाठी निकष जाहीर केले आहेत, आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंत्रिमंडळात समाविष्ट होऊ पाहणाऱ्या आमदारांचे रिपोर्ट कार्ड मागवले आहे.
मंत्रिमंडळात कोणाचा समावेश होणार?
महायुतीमध्ये खाते वाटप आणि मंत्रीपदाची चर्चा सुरु आहे. शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी पक्षांमध्ये कोणत्या पक्षाला कोणती खाती जाणार याबाबत चर्चा होत आहे. अमित शाह यांनी मंत्रिमंडळात समाविष्ट होऊ पाहणाऱ्या आमदारांच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी रिपोर्ट कार्ड मागवले आहे. यात संबंधित आमदाराची लोकसभा निवडणुकीतील कामगिरी, त्याच्या मतदार संघ आणि इतर जागांवर त्याने उमेदवार निवडून येण्यासाठी केलेले प्रयत्न, माजी मंत्री असेल तर मंत्रालयात कामकाज कशा प्रकारे केले, मंत्रिमंडळाच्या बैठकांची उपस्थिती आणि पालकमंत्रीपद सांभाळण्याची क्षमता या मुद्यांचा समावेश आहे.
मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी ठरला
महाराष्ट्रातील महायुतीच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी ५ डिसेंबर रोजी आझाद मैदानावर होणार आहे. या समारंभास पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांचे नाव निश्चित असल्याची चर्चा सुरु आहे, परंतु अधिकृत घोषणा अद्याप झाली नाही.
या अटींची पुर्तता करणाऱ्यास मंत्रीपद
केंद्रीय नेतृत्वाने मंत्रिपदे देताना काय निकष असावे, त्यासंदर्भातील अटी जाहीर केल्या आहेत. त्यात संबंधित आमदाराची लोकसभा निवडणुकीतील कामगिरी, त्याच्या मतदार संघ आणि इतर जागांवर त्याने उमेदवार निवडून येण्यासाठी केलेले प्रयत्न, माजी मंत्री असेल तर मंत्रालयात कामकाज कशा प्रकारे केले, मंत्रिमंडळाच्या बैठकांची उपस्थिती आणि पालकमंत्रीपद सांभाळण्याची क्षमता या मुद्यांचा समावेश आहे. मंत्री असणाऱ्याने सर्वांना समावून घेण्याची जबाबदारी पार पाडावी तसेच कोणताही वादविवाद नको आहे, अशा सूचनाही केंद्रीय नेतृत्वाने दिल्या आहेत.















Discussion about this post