मुंबई | नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी पैशांच्या बंडलचे काही व्हिडीओ ट्विटर हँडलवर पोस्ट केले आहे. त्यात एक आमदार आणि दुसऱ्या फ्रेममध्ये नोटांची बंडलं दिसत आहेत. दानवे यांनी हे व्हिडिओ शेअर करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.
हे आमदार कोण आहेत ?
अंबादास दानवे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर ३ व्हिडीओ पोस्ट केले आहेत. हे व्हिडीओ पोस्ट करत त्यांनी लिहिले की, ‘या सरकारकडे फक्त शेतकरी कर्जमाफीला पैसा नाही. बाकी सगळं ओक्के आहे! जनतेला जरा सांगा मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदेजी, हे आमदार कोण आहेत आणि पैशांच्या गड्ड्यांसह काय करत आहेत?’ अंबादास दानवे यांनी हे व्हिडीओ पोस्ट करत हे सवाल केले आहेत.
या सरकारकडे फक्त शेतकरी कर्जमाफीला पैसा नाही.. बाकी सगळं ओक्के आहे!
जनतेला जरा सांगा मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदे जी, हे आमदार कोण आहेत आणि पैशांच्या गड्ड्यांसह काय करत आहेत?@mieknathshinde @Dev_Fadnavis @AmitShah @BJP4Maharashtra #Moneypower #ruins #Maharashtra pic.twitter.com/WUDpmedTgo— Ambadas Danve (@iambadasdanve) December 9, 2025
अंबादास दानवे यांनी हे व्हिडीओ पोस्ट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपला टॅग केले आहे. हिवाळी अधिवशेनाचा आज दुसरा दिवस आहे. त्यामुळे आजच्या अधिवेशनात हा मुद्दा गाजू शकतो. |
महत्त्वाचे म्हणजे, अंबादास दानवेंनी जो व्हिडीओ पोस्ट केला आहे त्यामध्ये दिसणारी व्यक्ती शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांच्यासारखी दिसत आहेत. ते बंडल हाताळणाऱ्या व्यक्तीशी व्हिडीओ कॉलवरून संवाद साधताना दिसत आहेत.
अंबादास दानवे यांना चॅलेंज
यावर शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांनी प्रतिक्रिया देत त्यांनी थेट अंबादास दानवे यांना चॅलेंज केले आहे. “अंबादास दानवे यांनी पुरावे सादर करावे. दानवेंना कुणी विचारत नाही. त्यांना कुठलं काम उरलं नाही. असं कुणाला तरी ब्लॅकमेल करणं, उचित नाही. त्यांना कुठलंही ज्ञान नाही, असं माझं व्यक्तिगत मत आहे. असं काही असेल तर त्यांनी ओपन चॅलेंज द्यावं. त्यांनी तो संपूर्ण व्हिडीओ दाखवावा,” असे दळवी म्हणाले.















Discussion about this post