जळगाव : अमळनेर तालुक्यातील पारळसरे येथील 32 वर्षीय तरुण शेतकऱ्याने राहत्या घराच्या दुसऱ्या मजल्यावर गळफास घेवून जीवन यात्रा संपवली. सोपान महारू कोळी (वय ३२) असं आत्महत्या केलेल्या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोपान कोळी हा आपल्या पत्नी आणि मुलाबाळांसह वास्तव्यास होता. शेतीचे काम करून उदरनिर्वाह करत होता. नेहमीप्रमाणे सकाळी त्याची पत्नी कामावर गेली होती. त्यानंतर सोपान राहत असलेल्या घराच्या वरच्या मजल्यावर एकटाच असताना त्याने झोक्याच्या दोरीने गळफास घेत जीवन संपवले.
सोपानच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आले नाही. दरम्यान या संदर्भात मारवड पोलीस ठाण्यात अकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेबाबत पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण परधी करीत आहे.
Discussion about this post