अमळनेर । अमळनेर शहरातील अमलेश्वरनगर परिसरात घडलेल्या धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. गावठी कट्टा हाताळताना अरुण महाजन या तरुणाचा मृत्यू झाला, मात्र तपासात धक्कादायक खुलासा झाला की, त्याचा मित्र भूषण महाजन यानेच गोळी झाडून खून केला होता.
या घटनेबाबत असे की, मृतक अरुण महाजन यांनी २७ मार्च रोजी रात्री सव्वा नऊ वाजता पत्नीला दवाखान्यातून घेऊन पायी मित्र भूषण देविदास महाजन यांच्या घराकडे गेले. काही वेळानंतर मित्राचा फोन आल्याची माहिती मिळाली की अरुण याला चक्कर येऊन पडल्याचे सांगण्यात आले. अरुणच्या घरातील जमलेल्या लोकांनी सांगितले की भूषणने गोळी मारून त्याचा मित्र ठार केला आहे.
घटनेची त्वरित माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आरोपी भूषणच्या घराची झडती घेऊन काही नमुने तपासण्यात आले आहेत.अमळनेर पोलीस स्टेशनला अरुणचा भाऊ नरेंद्र यांनी फिर्याद दिली, ज्यावरून भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) प्रमाणे भूषण देविदास महाजन याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. सध्या तपास पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीज करत आहेत, तसेच आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.













Discussion about this post