अमळनेर । भरधाव कारने पुलाच्या कठड्याला धडक दिल्याने कार अनियंत्रित होऊन पलटी झाली. यात कार चालकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना अमळनेर- धुळे महामार्गावरील जानवे गावाजवळ असलेल्या पुलावर घडली. तर सोबत असलेली पत्नी व मुलगी गंभीर जखमी आहेत. हा अपघात शनिवारी जानवे गावाजवळ घडली.
अमळनेर- धुळे महामार्गावर झालेल्या अपघातात भगवान दलपत सपकाळे (वय ६३, रा. गिरणा पंपिंगजवळ, जळगाव) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. भगवान सपकाळे हे पत्नी विजया कोळी (वय ५५) आणि मुलगी कुंतला कोळी (वय २४) यांना घेऊन कारने अमळनेरहून धुळ्याकडे जात होते. या दरम्यान जानवे गावाजवळ असलेल्या पुलाच्या कठड्याला भरधाव चारचाकी धडकल्याने कार पलटी होऊन भगवान सपकाळे जागीच मृत्यू झाला. विजया आणि कुंतला कोळी दोन्ही जखमी झाले.
अपघात होताच परिसरातील ग्रामस्थांच्या मदतीने १०८ रुग्णवाहिकेने त्यांना उपचारासाठी धुळे जिल्हा सरकारी रुग्णालयात रवाना करण्यात आले. घटनेचे वृत्त कळताच सहायक निरीक्षक हरिदास बोचरे व पोलिस कर्मचारी कैलास शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पोलिस पाटील विलास पाटील यांच्या फिर्यादीवरून मृत भगवान सपकाळे यांच्याविरुद्ध स्वतःच्या मृत्यूस व दोघांना जखमी करण्यास कारणीभूत ठरले म्हणून अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक उपनिरीक्षक संजय पाटील तपास करीत आहेत.















Discussion about this post