राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामतीत अपघात झाला आणि त्यात त्यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झाला. यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांसह संपूर्ण महाराष्ट्र सून्न झाला. सर्वपक्षिय नेत्यांनी बारामतीकडे धाव घेतली. अजित पवारांवर प्रेम करणारी जनता प्रचंड अक्रोश करीत रडू लागली. काल दिवसभर आणि रात्रभर अजित पवारांच्या अंत्यदर्शनासाठी कार्यकर्त्यांचा समुदाय लोटला होता.
अखेर आज, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर आज (२९ जानेवारी) बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले गेले. अजित पवार यांचे सुपूत्र पार्थ पवार आणि जय पवार यांनी त्यांना अग्नी दिला. यावेळी संपूर्ण पवार कुटूंब उपस्थित होते.
अजित पवार यांच्या अंत्यदर्शनासाठी राज्यभरातील कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देशाचे गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्यासह अनेक महत्वाचे नेते उपस्थित होते. अजित पवारांच्या अंत्यदर्शनासाठी कालपासून बारामतीत मोठा जनसागर लोटला होता. यावेळी संकल्प, निष्ठा, कर्म, हाच आपला धर्म मानणाऱ्या अजित पवार यांना जड अंतकरणाने अखेरचा निरोप देण्यात आला.















Discussion about this post