पुणे । राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर थेट हल्लाबोल करताना अनेक खळबळजनक गौप्यस्फोट केले. तुम्ही सरकारमध्ये सामील व्हा, मी राजीनामा देतो, असं शरद पवारांनीच आपल्याला सांगितलं च अजित पवार म्हणाले होते. मात्र आता अजित पवार यांच्या या आरोपावर शरद पवार यांनी सडेतोड उत्तर दिले.
“जे काही घडलं याची चिंता करण्याचं कारण नाही. त्यामुळे संघटना ही स्वच्छ व्हायला लागली. त्याही पेक्षा नवीन लोकांना संधी द्यायची परिस्थिती आज निर्माण झाली आहे. युवकांची संघटना आपण मजबूत करु शकलो तर माझी खात्री आहे की, उद्या निवडणुका होतील त्यावेळेला महाराष्ट्राच्या विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस युवकची एक फळी निर्माण झालेली असेल. ते राज्य चालवतील, लोकांची प्रश्न सोडवतील. ही परिस्थिती नक्की येईल”, असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला.
राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या राज्यभरातील पदाधिकाऱ्यांची बैठक पुण्यात पार पडली. यावेळी ते बोलत होते.”ज्यांच्यासाठी तुम्ही कष्ट केले, तुम्ही शक्ती दिली, तुमच्यामुळे ते शक्तिशाली झाले ते काही आपले सहकारी सोडून गेले. त्यामुळे अडचणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. कोणी गेलं तर त्याची चिंता करण्याचं कारण नाही. कोणी गेलं तर त्याची चिंता करण्याचं कारण नाही. संघटना स्वच्छ होत आहे..” असा टोला शरद पवार यांनी यावेळी लगावला.
Discussion about this post