मुंब्रा परिसरातील प्रभाग क्रमांक ३० मधून निवडून आलेल्या सहर शेख पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. वडिलांच्या जात प्रमाणपत्र वैधता प्रकरणावरून त्यांच्या अडचणी वाढल्या असून, त्यांचे नगरसेविकेचे पदही धोक्यात आल्याची चर्चा आहे.
बनावट कागदपत्रांच्या आधारे शासनाची फसवणूक केल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर सहर शेख आणि त्यांचे वडील काही दिवसांपासून संपर्काबाहेर असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांचे फोनही लागत नसल्याने प्रशासन आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
कोणी केली तक्रार?
जात प्रमाणपत्र वैधता प्रकरणी सहर शेख यांच्या परिवाराकडून कमालीची गुप्तता पाळली जात आहे. दरम्यान सहर शेख यांच्या बनावट कागदपत्रांची तक्रार सिद्दीकी फराह शबाब अहमद यांनी दिली आहे. तक्रार करणारी सिद्दीकी फराह शबाब अहमद राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची उमेदवार होती. सिद्दीकी फराह शबाब यांच्या तक्रारीवर जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समितीची अहवाल लवकरच येणार आहे. त्याच दरम्यान सहर शेख आणि त्यांचे वडील युनूस खान नॅाट रिचेबल झाले आहेत.
फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश
सहर शेख व युनिस शेख हे दोन दिवसांपासून मुंब्र्यात नाही आहेत. सहर व युनिस यांचे जात प्रमाणपत्र बनावट व अवैध असल्याची ठाणे विभागीय कार्यालयाने माहिती दिल्यानंतर शेख यांच्याकडून कोणतेही अधिकृत प्रतिक्रिया समोर आली नाहीये. युनिस शेख आणि त्यांची मुलगी सहार शेख यांनी शासनाची दिशाभूल केल्यामुळे फौजदारी गुन्हा दाखल करावा असे आदेश तहसीलदार उमेश पाटील यांनी काढले आहेत.
या प्रकरणी तक्रार सिद्दीकी फराह शबाब अहमद यांनी केली असून, जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समितीचा अहवाल लवकरच येण्याची शक्यता आहे. दरम्यान, ठाणे विभागीय कार्यालयाने जात प्रमाणपत्र बनावट व अवैध असल्याची माहिती दिल्यानंतर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश तहसीलदार उमेश पाटील यांनी दिले आहेत.















Discussion about this post