मुंबई । सध्या राज्यात हिंदी आणि मराठी भाषेवरुन वाद सुरू झालाय. अशातच काल उद्योजक सुशील केडिया याने मराठी भाषेवरून थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनाच आवाहन केले होते. नाटक करु नका, मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा, असं म्हटलं होते. सुशील केडिया याच्यानंतर आता एका अभिनेत्यानं राज ठाकरेंना ओपन चॅलेज दिलंय.
मनोरंजन क्षेत्रात राज ठाकरे यांची मोठा दबदबा आहे. मनोरंजन क्षेत्रातील अनेक मान्यवर त्यांना भेटत असतात. इतकेच नाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मनसे चित्रपट सेना देखील कार्यरत आहे. मात्र त्याच मनोरंजन क्षेत्रातून त्यांना चॅलेंज दिलं जात आहे. दोन दिवसापूर्वी सुशील केडिया नावाच्या उद्योगपतीने त्यांना डिचवलं होतं. राज ठाकरेंनी त्यांची गुंडगिरी बंद करावी असं केडियानं म्हटलं होतं. आता एका भोजपुरी अभिनेत्यानं त्यांना चॅलेंज दिलंय.
काय म्हणाला निरुहुआ
अभिनेता आणि भाजप नेते दिनेश लाल यादव अर्थात निरुहुआनं राज ठाकरेंना आव्हान केलंय. मी मराठी बोलत नाही, भले महाराष्ट्रातून बाहेर काढून टाका, असं थेट चॅलेंज त्याने दिलंय. देशात कुठेही असे घडू नये. हा देश त्याच्या विविध भाषा आणि संस्कृतींसाठी प्रसिद्ध आहे, तरीही तो या विविधतेमध्ये एकता राखतो. घाणेरडे राजकारण करणाऱ्या लोकांनी असे करण्यापासून दूर राहावे. सावधगिरी बाळगावी. मला मराठी येत नाही. जर तुमच्यात ताकद असेल तर मला महाराष्ट्रातून हाकलून लावा., असं ओपन चॅलेंज निरुहुआनं दिलंय.
Discussion about this post