एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे.यासाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे.
या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया काल म्हणजेच २८ ऑगस्टपासून सुरु झाली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी www.aai.aero या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
अधिसूचनेनुसार, एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडियामध्ये ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह पदासाठी ९७६ जागा रिक्त आहेत या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ सप्टेंबर २०२५ आहे. या नोकरीसाठी निवड झाल्यावर उमेदवारांनी ४०,००० ते १,४०,००० रुपये पगार मिळणार आहे.
भरतीसाठी पात्रता :
ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी आर्किटेक्चर/इंजिनियरिंग / टेक्नोलॉजी / कॉम्प्युटर सायन्स/ कॉम्प्युटर इंजिनियरिंग किंवा आयटी विषयात पदवी प्राप्त केलेली असावी.
याचसोबत उमेदवारांची कमाल वयोमर्यादा २७ वर्षे असावी. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.
| जाहिरात (PDF) | Click Here |
| Online अर्ज | Apply Online |
अर्ज कसा करावा?
एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडियामधील नोकरीसाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
सर्वात आधी तुम्हाला www.aai.aero वेबसाइटवर जा.
या वेबसाइटवर RECRUITMENT OF JUNIOR EXECUTIVES यावर क्लिक करा.
यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन लिंकवर क्लिक करायचे आहे.
यानंतर यूजर आयडी आणि पासवर्ड टाकायचा आहे.
यानंतर तुम्हाला तुमची माहिती भरायची आहे. यानंतर कागदपत्रांची कॉपी टाकायची आहे.
यानंतर फॉर्म सबमिट करायचा आहे. याची प्रिंट आउट काढून ठेवावी.















Discussion about this post