जळगाव । एरंडोल तालुक्यातील खेडी कढोली येथे देवीच्या विसर्जन मिरवणुकीत धक्काबुक्की लागण्यावरून दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली असून या घटनेत तेरा जण जखमी झाले. यातील दोघांची प्रकृती गंभीर असून या संदर्भात अद्याप पोलिसात कुठलीही नोंद करण्यात आलेली नाही. या घटनेमुळे खेडी कडोली गावामध्ये खळबळ उडाली आहे.
याबाबत असे की, खेडी कढोली येथे जुन्या वादातून सोमवारी ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता देवीच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये धक्काबुक्की करत दोन गटात तुफान हाणामारी झाली. दोन्ही गटातील एकूण १३ जखमी झाले असून यातील दोन जणांची प्रकृती चिंताजनक आहे. गंभीर जखमी झाले आहे. दोन्ही गटातील जखमी झालेल्या व्यक्तींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले.
यावेळी दोन्ही गट पुन्हा रुग्णालयात समोरासमोर आल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या पोलिसांना पाचारण करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रण आणले. यानंतर जखमींवर उपचार करण्यात आले. या संदर्भात अद्याप पोलिसात कुठलीही नोंद करण्यात आलेली नाही.
दोन्ही गटातील एकूण १३ जण जखमी
प्रकाश सिताराम सोनवणे वय २७, सोनान नारायण सोनवणे वय २०, संदीप सिताराम सोनवणे वय ३०, ऋषिकेश विठ्ठल सोनवणे वय ३०, संतोष ऋषिदास सोनवणे वय २०, पुरुषोत्तम मोहन सोनवणे वय ३०, किरण युवराज सोनवणे वय ४०, नितीन अरुण सोनवणे वय २८, अरुण लहू सोनवणे वय ४९, मंगलाबाई सुरेश सोनवणे वय ५७, युवराज लहू सोनवणे वय ६०, दुर्गेश एकनाथ सोनवणे वय ३२, राहुल मोहन सोनवणे वय ३५ हे जखमी झाले आहेत.















Discussion about this post