कोल्हापूर । अपघाताची एक भीषण दुर्घटना कोल्हापूर जिल्ह्यातून समोर आली आहे. कोल्हापूरमधील शिराळा तालुक्यातील कोकरूड पुलावरून एक खासगी बस वारणा नदीपात्रात कोसळली.चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचं बोललं जात आहे. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही.
कोल्हापूरमध्ये खासगी ट्रॅव्हल्स वारणा नदीपात्रात कोसळली#kolhapur #warnariver #BusAccident #Maharashtra pic.twitter.com/ERDG1r9jsg
— Satish Daud Patil (@Satish_Daud) November 9, 2023
मिळालेली माहिती अशी, आज सकाळी ८ वाजेच्या दरम्यान पावलो कंपनीची ट्रॅव्हल्स गोव्याहून मुंबईला जाण्यासाठी शाहूवाडी-कराड मार्गे जात होते. ही बस अमेणी घाट मार्गे कोकरुड पुलावर आली, तेव्हा चालकाचा बसवरील ताबा सुटला. यामुळे ही बस पुलावर वारणा नदील कोसळली.
या अपघातात एकुण ४० प्रवासी प्रवास करत होते, काही प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.















Discussion about this post