जळगाव : मध्य रेल्वेच्या “ऑपरेशन मातृशक्ति” अंतर्गत रेल्वे सुरक्षा दलाने चाळीसगाव रेल्वे स्थानकावर एका गरोदर महिलेला तात्काळ मदत करत केली, यानंतर सदर महिलेने स्टेशनवरच मुलीला जन्म दिला. यात महिला उपनिरीक्षकासह आरपीएफचे जवान आणि प्रवासी डॉक्टरही सहभागी होते.
याबाबत असे की, इगतपुरी-भुसावळ मेमू ट्रेनमध्ये एका गरोदर महिलेला प्रसूती वेदना होत असल्याची माहिती चाळीसगाव येथील उप स्टेशन व्यवस्थापकांना मिळाली. त्याबरोबरच महिला उपनिरीक्षकासह आरपीएफच्या पथकाने प्रवाशांच्या मदतीने सावधपणे महिलेला चाळीसगाव स्टेशनवर उतरवले. ट्रेनमध्ये प्रवास करणारे डॉक्टरही मदतीला धाऊन आले आणि महिलेने स्टेशनवरच एका सुंदर मुलीला जन्म दिला.
“ऑपरेशन मातृशक्ति” ही मोहिमा मध्य रेल्वेने गरोदर महिलांना आपत्कालीन परिस्थितीत मदत करण्यासाठी सुरू केली आहे. यामध्ये मार्गात स्थानकांवर वैद्यकीय सुविधा, महिलेला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेणे आणि नातेवाईकांना माहिती देणे यासारख्या सुविधांचा समावेश आहे. या घटनेत महिला आणि नवजात बाळ दोघेही निरोगी असल्याचे सांगितले जात आहे.
महिला आणि बाळाला पुढील उपचारासाठी चाळीसगाव सिव्हिल हॉस्पिटल ट्रॉमा केअर सेंटरमध्ये नेण्यात आले आहे. या घटनेने रेल्वे सुरक्षा दलाच्या त्वरित प्रतिसाद आणि सहयोगाचे प्रतीक म्हणून पाहिले जात आहे.















Discussion about this post